महारष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल ह्यांनी पद्मावती चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले कि अल्लाउद्दिन खिलजी कट्टरपंथी आतंकवादी संगठन आयएसआयएस पेक्षा हि खतरनाक होता. रावल ह्यांनी चित्रपटाच्या नावावर इतिहास चुकीचा मांडला जातोय असे सांगितले आहे. ते बोलले कि सेन्सॉर बोर्डाने जबाबदारी ने काम करायला हवे. तर उमा भारती ह्यांनी चित्रपट रिलीज शी संबंधितअनेक ट्विट केले. त्यांनी लिहीले आहे कि राणी पद्मावतींच्या बाबतीत मी तठस्थ राहू शकत नाही. माझेनिवेदन आहे कि पद्मावती ला राजपूत समाजाशी न जोडता भारतीय नारीच्या अस्मितेशी जोडून बघितलेपाहिजे.मला वाटते कि रिलीज होण्या आधी इतिहासतज्ञ, चित्रपटाची टीम, विरोध करणाऱ्यांचा प्रतिनिधीआणि सेन्सॉर बोर्ड मिळून एक कमिटी बनवावी आणि ह्या चित्रपटावर योग्य निर्णय घ्यावा.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews